राजापूर शहरातील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण करावीत: माजी नगराध्यक्ष जमीर खलिफेंची मागणी
राजापूर नगर परिषद हद्दीमधील रस्ते व गटारांची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी अशी मागणी राजापूर चे माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. राजापूर शहरातील शिवाजीपथ रस्ता याला जोडणारे अन्य जोड रस्ते यांची कामे पूर्ण करावी तसेच या रस्त्याला असलेली गटारांची कामे देखील तात्काळ पूर्ण करावी. त्याचप्रमाणे जकात नाका ते जवाहर चौक या दरम्यानच्या रस्त्याचे काम देखील तात्काळ पूर्ण करावे. जकात नाका ते जवाहर चौक या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या अनुषंगाने भूमिगत गटारे व अन्य काही कामे प्रलंबित असल्यास ती देखील पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे शहरातील नळपाणी योजनेचे देखील प्रश्न सोडवावा. पावसाळ्यापूर्वी शहरवासीयांना सुरळीत व नियमित पाणीपुरवठा व्हावा या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी राजापूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी केली आहे.
राजापूर शहरातील शिवाजी पथ रस्त्याला जोडणारे अनेक जोड रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना बाजारपेठेत जाण्याकरिता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जोड रस्त्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे बाजारपेठेतील दुकानदारांना देखील अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळेही जोड रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी जमीर खलिफे यांनी यावेळी केली.
Comments
Post a Comment