रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका

*रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका गरजेची होती. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना मुंबई वा रत्नागिरीमध्ये हलविताना रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडत असे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार व प्रदेश सचिव प्रमोदजी जठार यांनी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका देण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर माझ्या आमदार निधीतून रुग्णवाहिका तयार करण्यात आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते मुंबईत आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी माझ्याबरोबरच श्री. प्रमोदजी जठार, भाजपाचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, सरचिटणीस अॅड. सुशांत पवार, मोहन घुमे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष श्रुती ताम्हणकर, सरचिटणीस अनुजा पवार, रमेश आंब्रे आदींची उपस्थिती होती.  BJP Maharashtra BJP Thane City District Devendra Fadnavis*

Comments