राजापूर वरचीपेठ येथील वहाळात सुरु आहे अनधिकृत बांधकाम, तरिही राजापूर नगर परिषदेचे दुर्लक्ष, जिल्हा प्रशासन अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश देणार का? नागरीकांचा सवाल
राजापूर शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात राजापूर नगर परिषद प्रशासनाला अपयश येत आहे का असा सवाल उपस्थित झाल्यास काहिच वावगे ठरणार नाहिये. राजापूर शहरातील वरची पेठ येथे एका वहाळात चिरेबंदी बांदी घालून अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार गतवर्षी एका नगरसेविकेने दिली होती. मात्र आता या वर्षी याच जागेवर चिरेबंदी बांदी आहे तशीच आहे. शिवाय आणखी त्याच्या आजुबाजुला बांदबंदिस्ती घातलेली दिसून येत आहे. या वहाळानजिक असलेल्या जमिनीची मशागत करण्यात येत आहे. त्याच्याच खाली वहाळ येत असून वहाळातच चिरेबंदी बांदबंदिसती घातलेली दिसुन येत आहे. राजापूर नगर परिषद प्रशासनाचे याकडे लक्ष नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजापूरच्या बाजारपेठेत एखादा भाजी विक्रेता विनापरवाना भाजी विक्री करावयास आला तर नगर परिषदेचे कर्मचारी तात्काळ त्याच्यावर कारवाई करतात किंवा त्याच्यावर दंड करतात. तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्षही करतात? हा दुजाभाव नेमका कशासाठी असा सवाल सध्या उपस्थीत केला जात आहे.
रत्नागिरिच्या जिल्हा प्रशासनाने कुवारबाव परिसरातील अनधिकृत टप-या हटविल्या होत्या. त्याच धरतीवर राजापूर शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास जिल्हा प्रशासन राजापूर नगर परिषदला आदेश देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजापूर नगर परिषद प्रशासन अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत काय निर्णय घेते याकडे नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment