राजापूरातील देवाचे गोठणे गावात बिबट्या वाघाची दहशत, वन विभागाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे परिसरात बिबट्या वाघाचा संचार आहे. देवाचे गोठणे गावातील केरावळे, राघववाडी, घाडीवाडी, परवडीवाडी, धाऊलवल्ली मारवेल वाडी या परिसरात बिबट्या वाघ भर वस्तीत दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्या वाघ वस्तीत येऊन कुत्रे, मांजरे खाऊन फस्त करत आहेत. वस्तीत रात्रीच्या वेळेस हा बिबट्या वाघ येतो. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. 

Comments