राजापूरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत पक्षप्रवेश

जिल्हा परिषद आणि पंचायत  समिती  निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी आपल्या मतदार संघामध्ये पक्ष प्रवेशाचा धमाका सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत  समिती सदस्य प्रतीक मटकर आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार विनायक  राऊत, आमदार डॉ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतीक मटकर, दयानंद चौगुले (राष्ट्रवादी विभाग अध्यक्ष), मनीष लिंगायत (रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष), जितेंद्र वेताळे (राष्ट्रवादी बूथ कमिटी अध्यक्ष ओणी), समीर तुळसणकर (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ओणी, सचिन टाकळे राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधून आणि भगवा झेंडा खांद्यावर देत शिवसेनेमध्ये स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची ओणी विभागासह राजापूर तालुक्यामध्ये ताकद वाढली आहे. त्याचवेळी या पक्ष प्रवेशाच्या  माध्यमातून आमदार डॉ राजन साळवी यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत  समिती निवडणूकीपूर्वी विरोधकांना इशारा दिला आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार, खासदार विनायक  राऊत, आमदार राजन  साळवी  याच्या काम करण्याच्या पद्धतीने प्रभावित  होऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश  केल्याचे माजी पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर आणि सहकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments