राष्ट्रवादी काँग्रेस कोकणनगर प्रभाग क्रमांक 4 महिला शहराध्यक्ष पदी मुनव्वर सुलतान उर्फ मुन्नी फराहन मुल्ला यांची नियुक्ती
सौ मुनव्वर सुलतान उर्फ मुन्नी मुल्ला यांची सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पाहता तसेच रत्नागिरी शहरातील कोकणनगर प्रभागात महिलांच्या अडीअडचणीला धावून जाणार्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्यां सौ मुन्नी मुल्ला यांची महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य जेष्ठ नेते श्री बशीरभाई मुर्तझा यांच्या अध्यक्षतेखालील महिला शहराध्यक्षा सौ नेहालीताई नागवेकर यांनी त्यांची प्रभाग क्रमांक 4 च्या महिला अध्यक्ष पदी नियुक्ती केली.
सौ मुनव्वर सुलतान उर्फ मुन्नी मुल्ला यांनी रत्नागिरी न्युजशी बोलताना सांगितले कि पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधीही तटा न जावू देता अतिशय प्रामाणिक पणे काम करेन तसेच येणाऱ्या र.न.प निवडणूकीला दोन्ही सिट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असतील.
यावेळी उपस्थितीत अल्पसंख्याक महासचिव नौसीन काजी, महिला तालुकाध्यक्ष सौ शमीमताई नाईक, युवक तालुकाध्यक्ष सिध्देश शिवलकर, महिला सरचिटणीस सौ दुरदानाताई प्रभुलकर, युवा कार्यकर्ते फराहन मुल्ला, इरफान खान, तौसीफ डिंगणकर आदी कार्यकर्ते होते.
Comments
Post a Comment