सागरी पोलीस ठाणे नाटे येथील दाखल चोरीचा गुन्हा 24 तासातच उघडकीस आला, गुन्हयात चोरीस गेलेली रोख रक्कम १२,६५,२४०/ - रुपये आरोपीत याचेकडुन करण्यात आली हस्तगत
फिर्यादी नौशाद महामुद शेकासन, वय ५६ वर्षे, रा. राहत अपार्टमेंट, रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनचे पाठीमागे, म्हस्कर हॉस्पिटल शेजारी, रत्नागिरी यांचा आंबा खरेदीचा व्यवसाय असुन ते कात्रादेवी, ता.राजापुर येथे तंबु मारुन आंबा खरेदी व त्याचे लोड करीता एकुण ०९ कामगारांसह तंबुत रहात होते. आंबा खरेदीसाठी आणलेली रोख रक्कम १२,६५,२४० /- रुपये त्यांनी त्यांचे जवळ काळया बॅगेत ठेवले होते. दिनांक १०/०५/२०२२ रोजी २२.०० ते ११/०५/२०२२ रोजी ००.४३ वा. चे मुदतीत ते सदर रोख रक्कम १२,६५,२४० /- रुपये असलेली बॅग ते आपल्या डोक्याखाली ठेवुन झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदरची रक्कम असलेली बॅग त्यांचे संमत्तीशिवाय लबाडीचे इरादयाने चोरुन नेली. म्हणुन फिर्यादी नौशाद महामुद शेकासन यांनी दिले फिर्यादीवरुन सागरी पोलीस ठाणे नाटे येथे गुन्हा रजि. नं. ४६/२०२२ भा.द.वि.सं.कलम ३७९ प्रमाणे दिनांक ११/०५/२०२२ रोजी १६.०४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा निवास साळोखे यांनी सागरी पोलीस ठाणे नाटे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना गुन्हे तपासकामी मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्यावरुन सागरी पोलीस ठाणे नाटे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांचे करवी तपास चालु होता. सदर पथक कात्रादेवी, ता राजापुर येथे तंबु मारुन फिर्यादी हे आंबा खरेदी करीत असलेल्या परिसरात अज्ञात आरोपीत याचेबाबत माहीती घेत असताना कात्रादेवी चौक येथील " ऑपरेशन नेत्रा " अंतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न झाला. त्यावरुन सदर संशयित इसम रेहान बाबामियाँ मस्तान, वय ३४ वर्षे, रा. मिरकरवाडा, ता. जि रत्नागिरी यास चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेला माल रोख रक्कम १२,६५,२४० /- रुपये त्याचेकडुन हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपीत इसम रेहान बाबामियाँ मस्तान यास सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणण्यात आलेला असुन, गुन्हयात चोरीस गेलेली रोख रक्कम १२,६५,२४० / - रुपये आरोपीत याचेकडुन हस्तगत करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा निवास साळोखे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यल पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलिस हवालदार विकास चव्हाण, पोहवा / शशांक फणसेकर , पोहवा / नरेंद्र जाधव, पोना / प्रसाद शिवलकर, पोना / कुशल हातिसकर, पोशि / गोपाळ चव्हाण, चालक पोशि / विनोद रसाळ सर्व नेमणुक सागरी पोलीस ठाणे नाटे तसेच पोहवा / सुभाष भागणे, पोहवा / शांताराम झोरे, पोहवा / बाळु पालकर, पोहवा / सागर साळवी, चालक पोशि / अनिकेत मोहिते सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांनी केलेली आहे.
Comments
Post a Comment