रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन, जय भैरव नवरात्रौत्सव मंडळ, मांडवी पर्यटन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी समुद्र किना-यावर 22 मे रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरीतील मांडवी समुद्र किना-यावर 22 मे रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन, जय भैरव नवरात्रौत्सव मंडळ, मांडवी पर्यटन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. 22 मे रोजी सायंकाळी पाच वाजता मांडवी येथे वाळूत मॅट टाकून त्यावर ही कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सदानंद जोशी, आनंद तापेकर, भाई विलणकर, राजीव कीर आदी उपस्थीत होते. कोकणात कुस्ती प्रेमी आहेत. कुस्तीगिरांना एक संधी मिळावी या हेतूने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्याला एक हजार रुपये रोख रक्कम व शिल्ड, उप विजेत्यास पाचशे रुपये रोख रक्कम व शिल्ड असे बक्षिस देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 12 मे ते 21 मे या कालावधीत छ.शिवाजी महाराज स्टेडियम वर कुस्ती प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
21 मे रोजी सकाळी सात वाजता मांडवी पर्यटन सन्स्थेच्या वतीने मांडवी किना-याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचा पर्यटकांनी, रत्नागिरीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment