दिनांक 14, 15 व 16 मे या दिवशी एस.टी. ला लाखो रुपयांचा फायदा, परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांचे नियोजन
दिनांक 14, 15 व 16 मे 2022 या तारखांना सलग सुट्ट्या असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटकांनी चाकरमान्यांची गर्दी वाढलेली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने दिनांक 14 मे 2022 रोजी 648 गाड्या सोडून 85,74,604/- इतके उत्पन्न प्राप्त केले असून या दिवशी 1,68,165 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. दिनांक 15 मे 2022 रोजी 647 गाड्या सोडून 92,36,974/- इतके उत्पन्न प्राप्त केले असून 1,69,257 इतक्या प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. दिनांक 16 मे 2022 रोजी 660 गाड्या सोडून 89,28,436/- इतके प्रवासी उत्पन्न प्राप्त झालेले असून 1,61,911 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे.
सध्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मुंबई, बोरिवली, पूणे, ठाणे, नालासोपारा, भाइंदर व विरार या मार्गावर जादा राज्य परिवहन बस सोडून प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी राज्य परिवहनच्या बसेस मधून किफायतशीर व सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन विभाग रत्नागिरी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment