रत्नागिरी जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतींमध्ये 164 जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यातील पाच ग्रामपंचायती, दापोली तालुक्यातील आठ ग्रामपंचायती, खेड तालुक्यातील सोळा ग्रामपंचायती, चिपळूण तालुक्यातील चौविस ग्रामपंचायती, गुहागर तालुक्यातील तेरा ग्रामपंचायती, संगमेश्वर तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायती, रत्नागिरी तालुक्यातील सात ग्रामपंचायती, लांजा तालुक्यातील चार ग्रामपंचायती व राजापूर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूका होणार आहेत.
दिनांक 13 मे 2022 ते 20 मे 2022 या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागविणे, सादर करणे, दिनांक 23 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्राची छाननी, दिनांक 25 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 5 जून 2022, मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक 6 जून 2022, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतीम दिनांक 9 जून 2022 असा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे.
Comments
Post a Comment