कै. महादेवराव शिर्के संस्थापक माध्यमिक विद्यालय भोंम यांच्या स्मृतिदिनी विद्यार्थ्यांनी केला श्रमदानातून आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ, आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांच्या संकल्पनेतून स्वच्छ्ता मोहीम यशस्वी, परिसर झाला स्वच्छ, आशा सेविका आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य

चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे कापरे च्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रम राबविले जातात. अनेक उपक्रम आणि शिबिरे घेतली जातात. नुकताच केंद्र सरकारच्या कायाकल्प योजने अंतर्गत स्वच्छ्ता विषयी तपासणीसाठी जिह्याची एक टीम आरोग्य केंद्रात येणार होती. या योजने अंतर्गत या पूर्वी दोन वेळा तृतीय पारितोषिक आरोग्य केंद्र कापरेला मिळाले आहे. त्यावर समाधान न मानता या वेळी प्रथम क्रमांकावर नाव कोरण्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्यातूनच हे परीक्षण हे संपूर्ण  स्वछतेशी निगडित असल्याने आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री परशुराम निवेंडकर यांनी शक्कल लढऊन कार्यक्षेत्रातील कै. महादेवराव शिर्के माध्यमिक विद्यालय भोम येथे तेथील मुख्याध्यापक तानाजी  कांबळे यांची भेट घेऊन येणाऱ्या टीम बद्दल चर्चाकेली  आणि स्वच्छता करण्यासाठी मुलांची मदत लागणार आहे असे सांगितले. मुख्याध्यापक श्री. तानाजी  कांबळे सर यांनी संस्था सचिव श्री. प्रशांत शिर्के यांच्याशी चर्चा केली आणि तत्काळ होकार दिला. त्या साठी निमित्त ठरले ते कै. महादेवराव शिर्के शिक्षण संस्था भोम या संस्थेचे संस्थापक कै. महादेवराव शिर्के यांची 7 एप्रिल रोजी  पुण्यतिथी असते. त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ही स्वच्छ्ता मोहीम पूर्ण झाली. या विद्यालयाच्या mcc चे 70 विद्यार्थी सह शिक्षक दत्तात्रय वाघमारे आणि मुकुंद पोटभरे सहभागी झाले होते आणि आरोग्य केंद्राच्या बाहेरील संपूर्ण परिसर स्वच्छ करून दिला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत माने, डॉ. अंकुश यादव, आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर, सहायका श्रीमती सीमा कवठनकर, गटप्रवर्तक स्वाती वरवडेकर, आरोग्य सेवक नरेंद्र चव्हाण, भूपेश जाधव, उमेश मोहीरे, सचिन कदम, दिनेश कदम, आरोग्य सेविका ममता मांडवे, शिल्पा कदम, शैला जावळे, स्मिता सावंत, रुपाली ठोंबरे, परिचर श्रीमती कदम, श्री. बिराजदार आणि मार्गदर्शनासाठी विस्तार अधिकारी श्री. चव्हाण तसेच  कार्यक्षेत्रातील सर्व आशा सेविका यांनी सहभाग घेतला. शेवटी आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांनी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि उपस्थित विद्याथ्र्यांचे तसेच आशा सेविका आरोग्य कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

Comments