श्रीक्षेत्र अवधूतवन स्वयंभू श्रीदत्त स्थान

तालुक्यातील मठ येथील काजळी नदीच्या काठावर असलेले श्रीक्षेत्र अवधूतवन स्वयंभू श्रीदत्त स्थान हे शासनाच्या  क  दर्जाच्या पर्यटन स्थळात मोडते. या परिसराचा पर्यटन व धार्मिक अनुषंगाने विकास व्हावा म्हणून मंदिराचे विश्वस्त व लांजा, देवरुख, रत्नागिरी तालुक्यातील दत्तभक्त दर महिन्याच्या पहिल्या रविवारी या मंदिरात एकत्र येतात. दत्तभक्त संपत खानविलकर यांच्या प्रय़त्नाने जिल्हा बॅंकेचे सदस्य व राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव यांनी या परिसराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून १५ लाखाचा निधी मंजूर करुन घेतला आहे. सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत अजित यशवंतराव यांच्या आभाराचा ठराव मंजूर करण्यात आला. 
मुंबई-गोवा महामार्गावरिल आंजणारी पुलापासून सुमारे तीन किलोमिटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र अवधूतवन आहे. येथे गरम पाण्याचे कुंड, अवदुम्बर वृक्ष, दत्तमंदिर व मंदिरा शेजारी काजळी नदीवर बांधलेला घाट आहे. या ठिकाणी अन्य राज्यातून शाळा, महाविद्यालय यांच्या शैक्षणिक सहली व पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. हे क्षेत्र प्रती नरसोबाचीवाडी म्हणून ओळखले जाते. नरसोबावाडी प्रमाणे येथे नारायण नागबळी, त्रिपींडी श्राद्ध आदी धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात केले जातात. भाविकांकरिता सर्वसोयीनी युक्त हॉल, स्वच्छतागृह, मुलांसाठी झोपळे, घसरगुंडी, नदीवरील घाट आदी कामे प्रस्तावित आहेत. जास्तीत जास्त दत्तभक्तांनी या कार्यासाठी देणग्या द्याव्यात असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुभाष पवार व कार्यवाह शशिकांत गुणे यांनी केले आहे. या बैठकीला सुभाष पवार, शशिकांत गुणे, रविकांत शिकरे, रविकांत सुर्वे, कपिल वेल्हाळ, प्रकाश पवार, रामचंद्र चव्हाण, अशोक शिंदे, संपत खानिवलकर, सुशिल काटकर, अनंत पवार आदी उपस्थित होते.
---------

Comments