म्हाप्रळ चेकपोस्ट नुकतनीकणाचे पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन

सोमवार 25/04/2022 रोजी मंडणगड पोलिस ठाणे अंतर्गत म्हाप्रळ चेकपोस्ट  इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन सोहळा  डॉ. मोहित कुमार गर्ग ,पोलीस अधीक्षक ,रत्नागिरी यांच्या शुभहस्ते व श्री. शशिकिरण काशिद ,उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड, श्रीमती शैलजा सावंत ,पोलीस निरीक्षक, मंडणगड तसेच मंडणगड पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार , म्हाप्रळ येथील सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. 
म्हाप्रळ चेकपोस्ट हे रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील सागरी सुरक्षा व पोलीस कामकाजाच्या दृष्टीने  महत्वाचे चेकपोस्ट असून या चेकपोस्टच्या नूतनीकरणामध्ये मा.पोलीस अधीक्षक यांनी व्यक्तीशः लक्ष देऊन पुढाकार घेतल्याने सदर इमारत नूतनीकरणामध्ये पोलीस कामकाजाच्या दृष्टीने सुसज्ज झालेली आहे. जेणेकरून म्हाप्रळ चेकपोस्ट वरील नेमणुकीचे पोलीस अंमलदार यांनाही त्यांचे दैनंदिन कर्तव्य अधिक सक्षमपणे करण्यासाठी त्याचा सकारात्मक उपयोग होईल.

Comments