बारसू-सोलगाव भागातील आगामी निवडणुकांमध्ये राजकिय पक्ष विरहित रिफायनरी विरोधी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार, सांताक्रुझ येथे पार पडली बैठक
रविवार दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी बारसू-सोलगाव या भागातील रिफायनरी विरोधी संघटना मुंबई व ग्रामीण यांची संयुक्त बैठक सांताक्रूझ येथे पार पडली. या बैठकीत पंचक्रोशीतील ग्रामीण व मुंबई समितीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, मार्गदर्शक उपस्थित होते. सुरुवातीला आतापर्यंत झालेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी लढयांविषयी आपले विचार मांडले व लढा तीव्र करण्याची इच्छा व्यक्त केली. या बैठकीत संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जोशी, अध्यक्ष वैभव कोळवणकर, ग्रामीण अध्यक्ष अमोल बोळे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, सचिव सतीश बाणे, मार्गदर्शक सत्यजीत चव्हाण, नितीन जठार, सचिन चव्हाण, तुळशीदास नवाळे, प्रकाश गुरव, सचिन गुरव, प्रसाद गुरव, सुहास थोटम, नाचणेकर, सूर्यकांत सोडये, आत्माराम घाडी, नरेंद्र कामटेकर, संतोष पुजारी, सूर्यकांत गोर्ले, मिलिंद राऊत, गणेश परवडी, जयवंत गिजम, चंद्रकांत वाईम, अनंत नवाळे, सदानंद सोगम सदानंद नवाळे, अनंत घाडी, तानाजी परवडी, सदानंद चव्हाण, गोपीनाथ घाडी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आतापर्यंतच्या आंदोलनाबद्दल समाधान व्यक्त करून सर्वसंमतीने खालील ठराव करण्यात आले-
१. रिफायनरी विरोधी पॅनलची अधिकृत घोषणा. ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद - निवडणुका लढविणे.
२. वाडी- वाडीत रिफायनरी विरोधी पॅनलचे बोर्ड लावणे.
३.परिसरातील गावांचे संपर्क अभियान- राजापूर तालुक्यातील सर्व १०१ गाव.
४.पंचक्रोशीतील महिलाचे संघटन करणे व मे महिन्यात मोठा महिला मेळावा.
५.सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचे लिखित राजीनामे.
६.सर्वच राजकीय पक्षांचे रिफायनरी समर्थक पदाधिकारी, आमदार, खासदार यांना रिफायनरी रद्द होईपर्यंत गावांत प्रवेश नाही.
७.आतापर्यंत मुख्यमंत्री ,पर्यावरण मंत्री , राज्यपाल आदीना भेटीसाठी दिलेल्या पत्राबद्दल फॉल्लो अप.
८.कोकणातील, मुंबई, पुणे तसेच दिल्ली येथील विविध संघटनांचे रिफायनरी विरोधात पत्र घेणे.
९.जमीन विक्री होऊ नये म्हणून जनजागृती अभियान राबविणे. असे ठराव करण्यात आले.
Comments
Post a Comment