स्वर्गीय आमदार कुसुमताईंचा आज स्मृतीदिन, भाजपातर्फे अभिवादन कार्यक्रम
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्याच्या व भाजपाच्या स्वर्गीय आमदार कुसुमताई अभ्यंकर यांचा आज मंगळवार (ता. ५) स्मृतीदिन आहे. यानिमित्त शहर व तालुका भाजपातर्फे एका अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज मंगळवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात कार्यक्रम होणार आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्व. कुसुमताई अभ्यंकर यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन प्रमुख उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार बाळासाहेब माने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी शहर व तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी आणि शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment