राजापूरात रविवारी मुसळधार पाऊस पडला, आंबा बागायतदार चिंतेत सापडले, तालुका कृषी विभागाने काय केले? किती आंबा बागायतींमध्ये भेटी दिल्या?
राजापूरात रविवारी 10 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वादळीवा-यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे थोडासा दिलासा मिळाला खरा. पण यामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत. मात्र एवढा पाऊस पडूनही राजापूर तालुका कृषी विभागाने काहिच दखल का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजापूरात मागिल आठवड्याभरात तुरळकशा प्रमाणात पाऊस पडत आहे. रविवारी 10 एप्रिल रोजी तब्बल अर्धा तास पाऊस पडला. सध्या आंबा फळ तोडीचा आणि आंबा विक्रीचा काळ आहे. आणि या काळातच पाऊस पडला. यामुळे तयार आंबा खराब होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस पडल्यानंतर तसेच वादळी वा-यामुळे आंबा फळ काही ठिकाणी गळूनही पडले. तसेच जे आंबे झाडावर राहिले ते आंबे झाडावरुन उतरवल्यानंतर चांगले राहतील की खराब होतील याची शाश्वती देता येत नाही. या समस्येमुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मात्र एवढे नुकसां होऊनही राजापूर तालुका कृषी विभाग तसेच तहसिल प्रशासन यांनी नेमकी काय भूमिका घेतली. कृषी विभागाला शेतक-यांप्रती काही काळजी आहे का नाही?किती गावात जाऊन कृषी विभागाच्या अधिका-यान्नी भेटी दिल्या. किती आंबा बागायतींची पाहणी केली? असे उलट सवाल उपस्थित केले जात आहेत.
Comments
Post a Comment