हातभार फाऊंडेशन हातखंबा, रत्नागिरी व शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी संयुक्त विद्यमाने आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थी सन्मान सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. इंदूराणी जाखड यांच्या उपस्थितीत संपन्न
हातभार फाऊंडेशन, हातखंबा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आदर्शवत कार्य करत असून मुलांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी इ 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे दि.5/01/2022 व दि.13/04/2022 रोजी दोन वेळा आयोजन हातभार फाऊंडेशने केले होते. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या 793 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन्ही सराव परीक्षेसाठी एकूण 3172 प्रश्नसंच हातभार फाऊंडेशन तर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. दोन्ही सराव परीक्षेत 29 केंद्रातील आलेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या एकूण 138 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. इंदूराणी जाखड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाण व शिष्यवृत्ती मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हातभार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व जि. प. रत्नागिरीचे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांनी केले. त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खासकरून हातभार फाऊंडेशन काम करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर शिक्षकांना शिकू द्यावे इतर अशैक्षणिक कामे कमी करावीत असे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पर्धा परीक्षेबरोबरच इंग्रजी विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक असून भविष्यात राज्यासमोर रत्नागिरी जिल्ह्याने आदर्श प्रस्तापित करावा. यासाठी इंग्रजी विषयाकडे विशेष लक्ष देण्यासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा प्रशिक्षण संस्था यांनी राबवावेत व त्यासाठी सर्व सहकार्य माझ्यामार्फत केले जाईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. हातभार फाऊंडेशननेही इंग्रजी विषयाच्या बाबतीत काम करावे असे आवाहन केले. त्याचबरोबर राज्यातील तीस लाख ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी तयारीसाठी एक राज्यस्तरीय उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता सामोरे जाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चौकस होऊन अचूक पर्यायाची निवडणे करणे आवश्यक असल्याचे व त्यासाठी विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होणे आवश्यक असल्याबाबतचे मत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, डायटचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. रत्नागिरी कडव, सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम प्रमुख विस्तार अधिकारी कांबळे, हातखंबा उपसरपंच सुनील डांगे, रत्नागिरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सुनील पाटील, विस्तार अधिकारी उत्तम भोसले, श्रीम.सरोज आखाडे, सर्व केंद्रप्रमुख, तालुक्यातील सर्व संघटना प्रतिनिधी, तालुक्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थी, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
परीक्षा घेणेसाठी प्रश्नपत्रिका संच कृष्णा मेस्त्री यांनी पुरवले तर कार्यक्रमाच्या तयारीसाठी मनोजकुमार खानविलकर, दत्तात्रय क्षिरसागर यांचेसह झरेवाडी केंद्रातील शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केले. उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहार व भोजन व्यवस्था हातभार फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गोसावी यांनी केले. आभार प्रदर्शन रत्नागिरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांनी केले.

Comments
Post a Comment