रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृह येथे रविवार दिनांक ८ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत "माझे विषय, माझे करिअर"* या कार्यशाळेचे आयोजन

शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या  भारतातील  अग्रगण्य अशा मनवेश सर्विस यांच्या विद्यमाने रविवार दि. ८ मे २०२२ रोजी रत्नागिरी येथील  पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृह येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत "माझे विषय, माझे करिअर"* या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
दिवसभराच्या या कार्यशाळेत विविध मनोरंजनात्मक  उपक्रमाद्वारे मुलांना विविध विषयांचे जीवनात काय महत्व आहे? त्याचा अभ्यास का करायचा? विषयानुरूप अभ्यास करण्याची पद्धत कशी असली पाहिजे? आणि अभ्यासात करिअरच्या वाटा कशा दडलेल्या आहेत,  भविष्यात विद्यार्थी कोणत्या विषयात करिअर करू शकतो या बाबत या कंपनीचे कार्यकारी संचालक श्री.मंगेश भणगे मार्गदर्शन करणार आहेत.
मनवेश सर्विस ही नाशिक मधील नावाजलेली संस्था  असून त्यांनी विविध नवनवीन उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात राबवलेले आहेत. त्यांनी तयार केलेले करिअर महत्वाकांक्षा सर्वेक्षण भारतातील लाखो मुलाना करिअर चे योग्य मार्ग निवडायला मदत करत आहे. मनवेश सर्विस चे  संचालक मंगेश भणगे हे भारतातील एक  नावाजलेले ट्रेनर आणि व्यवस्थापन सल्लागार आहेत. 
कोविड  काळात मुलानी अभ्यासाच्या खूप अडचणी सहन केल्या. यामुळे मुलांच्या मनात अभ्यासाबद्दल अनास्था तयार झाली आहे. यातून मुलाना बाहेर आणण्यासाठी असे म्हणतात की पाया जितका भक्कम व सखोल असेल तितकेच विद्यार्थ्यांचे भविष्य भक्कम व उज्वल होईल याचसाठी  आम्ही  इ.७ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी  विविध उपक्रमाचे आयोजन करत आहे. याशिवाय  'मला इंजिनियर व्हायचंय तर मला भाषा का शिकवता ?' 'मला मेडिकल मध्ये करिअर करायचंय, मला इतिहास का शिकायचा ?'  या मुलांच्या मनात दडलेल्या विविध   प्रश्नांना उत्तर मिळत नाहीत. अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा कार्यक्रम मुलांसाठी एक मेजवानी तर  ठरणार आहेच पण भविष्याचा वेध घेणारा देखील  आहे. मजेशीर मार्गानी हि उत्तर मिळतांनाच विविध विषयामध्ये करिअर च्या वाटा कशा  सापडू शकतात हे देखील मुलाना समजणार आहे. 
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना आपल्या करिअरच्या वाटा निवडण्यासाठी उपयुक्त माहिती मिळणार आहेच परंतु त्याच वेळी एक तास पालकांशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.
रत्नागिरी मधे प्रथमच होणाऱ्या  या कार्यशाळेचा पालक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसेच माफक फी सह  प्रथम नोंदणी करणाऱ्या इ.७ वी ते इ. ९ वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या  फक्त ४० विद्यार्थी यांनाच प्रवेश देण्यात येणार असून या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी रत्नागिरी येथील सौ. संगीता दामले जोशी -(पुणे)-8806499555, सुजाता गोखले (रत्नागिरी)-९५४५७८२५७० यांच्यांशी  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments