राजापूरात जावेद ठाकूर कॉम्प्यूटर अकादमी या अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन

जान मंदिरे हि समाजाच्या उत्कर्षासाठी महत्वाची असून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक समाज घटकाने पुढे येणे हि काळाची गरज आहे. शिक्षणाच्या संधी निर्माण करणाऱ्या संस्थाच यापुढे भरीव कार्य करून टिकाव धरून राहतील. म्हणून आपण सर्वांनी शिक्षणातील पारंपारीकता विसरून आधुनिकतेची कास धरली पाहिजे असे उदगार प्रख्यात उद्योजक व ठाकूर उद्योग समूह राजापूरचे अध्यक्ष अशफाक ठाकूर यांनी येथे बोलताना व्यक्त केले. राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.जावेद ठाकूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ' जावेद ठाकूर कॉम्प्युटर अॅकॅडेमी ' या अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये अशफाक ठाकूर यांचे हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर संस्था अध्यक्ष सुलतान ठाकूर, उपाध्यक्ष निजाम काझी, संस्था सचिव मजीद पन्हळेकर, खजिनदार म.हनीफ काझी, माजी अध्यक्ष महामुद मुल्ला, प्रशालेचे प्राचार्य राजेंदकुमार व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्था सचिव मजीद पन्हळेकर तसेच प्रशालेचे प्राचार्य राजेंदकुमार व्हनमाने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजापूर शहर पाच मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष शौकत नाखवा, राजापूर शहराचे माजी लोकनीयूक्त नगराध्यक्ष अॅड . जमिर खलिफे, संस्थेचे माजी सचिव लियाकत काझी, माजी खजिनदार रफिक मिठा, अलिमियाँ काझी, श्री कॉम्प्युटरचे संचालक सुघोष काळे, वजुदिदन मुल्ला, जमालुद्दिन वाघू, अबुबक्कर काझी, उस्मान मुजावर, संस्था सदस्य मुश्ताक नाखवा, असलम कोंडकर, अशफाक काझी, इरफान वस्ता, जि.प. उर्दु शाळेचे मुख्याध्यापक अझिम भाटकर, राम करंबेळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुरआने पाक ने करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालन प्रा. जहिर रिझवी यांनी केले तर आभार प्रशालेचे प्राचार्य राजेंदकुमार व्हनमाने यांनी मानले.

Comments