रत्नागिरीत शिवसेनेच्यावतीने इफ्तार पार्टी, मंत्री उदय सामंत म्हणाले रत्नागिरीत हिंदू-मुस्लिम सलोखा आहे, हा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे

रत्नागिरी शिवसेनेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहिवर्षी रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांकरिता इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी उद्यमनगर येथील एम.डी.नाईक हॉल येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या इफ्तार पार्टिच्या वेळी त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सलग 12 वर्षे इफ्तार पार्टी आयोजीत करण्यात येत आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले ही इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम समन्वयाचे प्रतिक आहे. आम्ही एकामेकाच्या दुःखात नेहमी सहभागी होत असतो. हिंदू सणांच्या वेळेस रत्नागिरीतील मुस्लिम बांधवही सहभागी होत असतात. त्यामुळे हा जी काही हिंदू मुस्लिम सलोखा आहे याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे. असे मत यावेळी व्यक्त मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. 
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती बाबू म्हाप, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक राजन शेट्ये, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, पत्रकार अलिमिया काझी, युवासेनेचे तुषार साळवी, शकील मुर्तुझा, शकील मोडक, शकील मझगावकर, रिजवान मुजावर, अल्ताफ संगमेश्वरी, विजय खेडेकर, प्रसन्न आंबुलकर, मुन्ना देसाई आदी उपस्थीत होते. 

Comments