राजापूरातील तळगाव मोसम परिरातून होतेय अवैध गुरांची वाहतूक? गुरांना नंबर देण्यात आले आहेत त्यानुसार गुरांचा तपास होणार का?
राजापूर तालुक्यातील तळगाव मोसम परिसारातून अवैध गुरांची वाहतूक होत असल्याचे बोलले जात असून खरेच अशा प्रकारची अवैध गुरांची वाहतुक होतेय का याचा तपास त्या भागातील बीट अंमलदारांनी केला आहे का असा सवाल सध्या उपस्थीत केला जात आहे.
राजापूर तालुक्यातील तळगाव मोसम या गावात एका भल्या मोठ्या जंगलात गुरे गावागावातून आणून त्या ठिकाणी ठेवली जात असून तिथून ट्रक मधून गुरांची कर्नाटकच्या दिशेने वाहतुक केली जात असल्याचे बोलले जात आहे. केळवली ते मोसम परिसरात या चर्चेने खळबळ उडाली आहे. रातोरात गुरांची वाहतूक करणारा हा व्यक्ती नेमका कोण? त्याला साथ देणारा आणखी कुणी आहे का? पोलिस या बाबीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
राजापूर पोलिस स्थानकात यापूर्वी विनापरवाना गुरांची वाहतूक करणा-यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा मोसम परिसरात अवैध गुरांची वाहतूक होत असल्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे नेमके काय खरे आणि काय खोटे याची शहानिशा करण्यासाठी पोलिस प्रशासन ठोस पावले उचलणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजापूर तालुक्यात गुरांची जनगणना झाली असून प्रत्येक गावातील गुरांना नंबर देण्यात आले आहेत. त्यानुसार तपास होणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment