रत्नागिरी रिक्षा व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या सीएनजी गॅससंदर्भातील प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाधिका-यांना निवेदन

रत्नागिरी शहर व तालुक्यामधील रिक्षा व्यवसायिकांना तसेच खाजगी सीएनजी वाहनधारकांना सीएनजीचा होणारा अनियमित पुरवठा, तो भरण्यासाठी लागणारा प्रचंड वेळ, व कमी प्रेशरने मिळणारा सीएनजी ,त्यामुळे बिघडणारे गाड्यांचे अँव्हरेज, रत्नागिरी सीएनजी ची असणारी अत्युच्च किंमत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रत्नागिरी तर्फे नुकतेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या सर्व बाबींची सखोल चर्चा आलेल्या शिष्टमंडळाबरोबर करून, लवकरच या संदर्भात बैठक लावण्यात येईल असे माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बशीरभाई मुर्तुझा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, , सनिफ गव्हाणकर, संतोष सावंत ,संकेत कदम ,मुज्जु काझी व रिक्षा व्यावसाईक उपस्थीत होते.

Comments