राजापूर नगर परिषदेने प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या, मग कापडी पिशव्या कोण देणार? दर गुरुवारी आठवडा बाजारात येणा-या नागरीकांनी कापडी पिशव्या आणाव्यात अशी गावागावात जाऊन सुचना देणार का?

राजापूर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक बंदी च्या कायद्यान्वये प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राजापूर शहरात भरणा-या आठवडा बाजारातील दुकानात थेट भेटी देऊन प्लास्टिक विक्रिवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र असे असले तर मग राजापूर नगर परिषदेच्या मार्फत गुरुवारी आठवडा बाजारात येणा-या ग्राहकाला कापडी पिशवी देण्यात येणार का किंवा कापडी पिशव्या अधिकृत विक्रेते कोण आहेत?किंवा प्लास्टिक पिशव्यांच्या दरात कापडी पिशव्या कुठे विकत मिळतात? आणि प्लास्टिक पिशव्या निर्मात्या कंपनीवर राजापूर नगर परिषद कारवाई करणार का असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गुरुवारी दि. २१ /०४/२०२२ रोजी गुरुवार आठवडा बाजारात प्लास्टिक पिशव्या जप्ती कारवाई करण्यात आली. यावेळेस जप्ती करण्यासाठी राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत भोसले साहेब तसेच आरोग्य पर्यवेक्षक सौ श्रेया शिरवटकर, आरोग्य लिपिक श्री प्रसाद महाडीक सर, कर निरिक्षक - अविनाश नाईक, मुकादम राजन जाधव संदेश जाधव  सुशील यादव व कर्मचारी उपस्थित होते. 
कारवाई केल्यानंतर या अधिका-यांनी कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती केली का? गुरुवारी आठवडा बाजारात येणा-या नागरीकांना कापडी पिशव्यांच्या वापराबाबत काही माहीती दिली का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Comments