सौ.अनामिका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भंडारी हितवर्धक मंडळ,राजापुर तर्फे भंडारी समाजबांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

भंडारी हितवर्धक मंडळ,राजापुर तर्फे भंडारी समाजबांधवांचा मेळावा रविवार दि.१७ एप्रिल रोजी कलामंदिर राजापूर येथे सौ.अनामिका सौरभ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मेळाव्याची सुरुवात डॉ.मयेकर, अर्बन बँक संचालक श्री.अनिल करंगुटकर, कु.कुमुदिनी आंबेरकर, अंबोळगड सरपंच श्री.राजा पारकर, श्री.प्रवीण शिवणेकर, उपळे यांचे हस्ते दीप प्रज्वलीत करून झाली. अध्यक्षा.सौ. अनामिका जाधव यांचे हस्ते सरस्वती पूजन झाले. नंतर कोरोना काळात व त्यानंतरही मृत पावलेल्या सर्व समाज बांधव व थोर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष - श्री.नित्यानंद पाटील यांनी प्रास्ताविकातून मंडळाला आलेल्या अडचणी व त्यातून केलेली वाटचाल विशद केली. उपस्थित समाज बांधवांपैकी कार्यकारिणी सदस्य श्री.श्रीकृष्ण मयेकर, श्री. विनोद चव्हाण.उपाध्यक्ष, भंडारी महासंघ, श्री विकास चेऊलकर. मिठगवाणे  श्री.सौरभ जाधव. वेत्यें, पाथर्डे, श्री. अनिल करंगुटकर.दोनिवडे, श्री.नवीनचंद्र बांदिवडेकर-अध्यक्ष - अखिल भारतीय भंडारी महासंघ यांनी मार्गदर्शन केले. श्री.बांदिवडेकर यांनी राजापूरच्या भंडारी समाजाचे अध्यक्ष पद एका महिलेला दिल्याबद्दल कौतुक केले.
शेवटी अध्यक्षा - सौ.अनामिका जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मंडळाची पुढील ध्येय धोरणे, उद्दिष्टे व करावयाचे कार्यक्रम तसेच त्यात येणारे अडथळे, संकटे यावर सविस्तर भाष्य करून उपस्थितांची मने जिंकली.
मंडळाचे नजीकच्या काळात करावयाचे कार्यक्रम म्हणजे वधुवर सूचक केंद्र चालविणे, विद्यार्थी गुणगौरव, गरीब विद्यार्थ्यांना मदत, भंडारी कुटुंबातील वाद कौटुंबिक पातळीवरच सोडविणे, भंडारी समाजाच्या प्रत्येक गावात व वाडीत ग्राम समित्या स्थापन करणे, भंडारी समाजावरील अन्यायाला वाचा फोडणे, भंडारी समाजाच्या संगठन व उत्कर्षा साठी सदैव प्रयत्नशील राहणे, गावपातळी ते देशपातळी पर्यंत च्या समाज संघटनां मध्ये समन्वयक म्हणून काम करणे, राजापुर येथे भंडारी भवन बांधणे, निधी संकलन करणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर माजी नगरसेविका राजापूर सौ.स्वाती बोटले यांनी आभार प्रदर्शन करताना कलामंदिर सभागृह उपलब्ध करून दिले बद्दल राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, खानपान व्यवस्था संभाळले बद्दल खजिनदार श्री.प्रदीप भाटकर यांचे, प्रसिद्धी व वितरण व्यवस्थे साठी उपाध्यक्ष श्री.नित्यानंद पाटील, तसेच कार्यकारी मंडळ,उपस्थित समाज बांधवांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे अतिशय नेटके संयोजन श्री.रवींद्र घोसाळे सर व श्री.सुजित पारकर यांनी केले होते. तर श्री.सुजित पारकर यांनी सूत्र संचालन केले. कार्यालयीन कामकाज श्री.राजेंद्र मयेकर, श्री.घोसाळे सर व श्री.सुजित पारकर यांनी समर्थपणे पार पाडले. शेवटी राष्ट्रगीत होऊन मेळावा संपन्न झाला. 

Comments