राजापूरातील कुवेशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर कांबळी तर उपाध्यक्षपदी वैभव कुवेसकर यांची निवड

राजापूर तालुक्यातील कुवेशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर कांबळी तर उपाध्यक्षपदी वैभव कुवेस्कर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे गावातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. 
कुवेशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक बुधवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी झाली. यामध्ये मनोहर वासुदेव कांबळी यांचं 13 उमेदवारांचं पूर्ण पॅनल बहू मतांनी विजयी झालं. यामध्ये मनोहर वासुदेव कांबळी, वैभव वासुदेव कुवेसकर, प्रभाकर एकनाथ कुवेसकर, दिनेश सुभाष कुवेसकर, वसंत सीताराम बावकर, सचिन सखाराम गावकर, अशोक धोंडू नार्वेकर, नारायण जगन्नाथ रुमडे, विनायक सूर्यकांत खडपे, रोहिदास पांडुरंग आडीवरेकर, प्राची प्रदीप ताम्हनकर, सरोज प्रभाकर कुवेसकर, चंद्रकला पांडुरंग गवाणकर हे बहू मतांनी विजयी झाले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments