रत्नागिरी शहरामध्ये हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेला निर्णय आणि त्याबाबत संबंधितांना दिलेला आदेश स्वागतार्ह – राजन सुर्वे

रत्नागिरी शहरामध्ये हेल्मेट न करता पुणे येथे ज्याप्रमाणे हेल्मेट वापराबाबत प्रबोधन केले जात आहे त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात अधीकारी यांनी कार्यवाही करावी असे आदेश स्थानिक आमदार तथा आघाडी सरकारचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी दिल्याबद्दल रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी कॉॉंगसचे अध्यक्ष राजन सुर्वे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्तीबाबत अनेक महीन्यापासून नागरिकांकडून तिव्र नाराजी करण्यात येत होती. रत्नागिरी शहरातील अनेक नागरीकांनी ह्यासंदर्भात आमच्याकडे अनेक तक्रारी येत होत्या त्याबाबत संबंधितांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पाठपुरावा सुरु होता असे तालुका अध्यक्ष श्री. राजन सुर्वे यांनी सांगितले.
रत्नागिरी शहराचा प्रामुख्याने विचार करता साळवी स्टॉप ते मिरकरवाडा एवढिच शहराची हद्द आहे आणि त्याला लागुन बाकीची ग्रामिण क्षेत्र आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहरामध्ये हेल्मेट घालणेसाठी सक्ती करणे खरोखरच चुकीचा निर्णय होता. शहरातील व्यापारी, नागरीक, नोकरदार, कर्मचारी, विध्यार्थी आदी यांना नजिकच्या अंतरावर जाताना दिवसभर हेल्मेट घालून फिरायला लागत आहे. त्यामध्ये अनेक जणांना दिवसभर हेल्मेट घातल्यामुळे मानेचा त्रास होऊ लागला आहे.
रत्नागिरी शहराचे अंतर जवळ जवळ असल्यामुळे प्रत्येकाला नजीकच्या अंतरासाठी दिवसभर हेल्मेट घालून फिरणे असहाय्य झाले होते. त्याचप्रमाणे मानेच्या आजाराला आमंत्रण दिल्या सारखे होते. शहरामध्ये हेल्मेट घालून फिरताना नागरीकांना ठीकठीकाणी अचानक वळावे लागते. त्यावेळी पाठीमागून येणारी गाडी पटकन बघताना अडचण होत होती. परीणाम अपघाताला सामोरे जावे लागत होते आणि हा त्रास प्रामुख्याने महीलांना मोठ्या प्रमाणात होत आहे. हायवेवर हेल्मेट सक्त करणे खरोखरच गरजेचे आहे कारण त्याठीकाणी फिरणारे दुचाकीस्वार हे लांबचा पल्ला गाठणारे असतात पण रत्नागिर शहरात त्याची सक्ती करणे सध्या खरोखरच गरज नाही आहे. महाराष्ट्र आघाडी सरकारचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी हेल्मेट सक्ती न करण्याचे संबंधितांना दिलेले आदेश स्वागतार्ह असुन ते तात्काळ लागू करण्याकरिता रत्नागिरी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुध्दा पाठपुरावा करणार असल्याचे तालुका अध्यक्ष राजन सुर्वे यांनी सांगितले.

Comments