सामाजिक समता सप्ताह - रत्नागिरी समिती मार्फत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न, सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर प्रमोद जाधव, उपायुक्त ( प्रभारी) यांचे मार्गदर्शन

शासन आपल्या दारी या धर्तीवर गोगटे जोगळेकर कॉलेज,रत्नागिरी येथे सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर  प्रमोद जाधव, उपायुक्त ( प्रभारी) यांनी 11 वी विज्ञान व 12 वी विज्ञान च्या विदयार्थ्यांना दोन सत्रात व्याख्यान दिले. यात कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, मानीव दिनांक पूर्वीच्या पुराव्यांना अधिक महत्व आहे. वंशावळ प्रतिज्ञापत्र कसे करावे, मुस्लिम समाजासाठी आवश्यक पुरावे, अन्य राज्यातून आलेल्या कुटुंबाना त्यांच्या मूळ राज्याचे फायदे मिळतात, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्रयस्थ माणसाकडून फसगत होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची, कागदपत्रात बदल करू नये अशा विविध बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. तसेच शंका निरसन करण्यात आले. याच बरोबर तयार वैधता प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले. या वेळी डॉ.ज्योत्स्ना पडियार, अध्यक्षा  प्राचार्य डॉ.प्रफ़ुल्ल कुलकर्णी, पेडणेकर,  कर्मचारी वृंद, विदयार्थी व पालक उपस्थित होते. रत्नागिरी समिती मार्फत गेली सहा वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र गेली 2 वर्षे कोरोना मुळे यात खंड पडला होता. सुमारे 35 व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. या उपक्रमामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यास मदत होते.

Comments