रत्नागिरीत 30 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित वाड़्मय व पुनर्लेखन प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता अल्पबचत हॉल जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रकाशित वांग्मय व पुनर्लेखन असे एकूण सहा खंडांचे प्रकाशन महाराष्ट्र शासनामार्फत करण्याचे ठरविले आहे. प्रकाशन सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक 30 एप्रिल रोजी वि.दा.सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे शासनाच्या वतीने आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम बहुजन व बौद्ध समाजाने या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी यांच्या वतीने संस्थेचे जिल्हाध्यक्ष आयु सी.ए. जाधव यांनी केलेले आहे.

Comments