राजापूर शहरातील रानतळे मेहंदीनगर येथील रस्ता व मुजावर मोहल्ला कब्रस्तानसाठी 30 लाख निधी मंजूर

राजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या प्रयत्नाने राजापूर शहरातील रानतळे मेहंदीनगर येथील रस्त्याच्या कामासाठी व मुजावर मोहल्ला कब्रस्तानसाठी प्रत्येकी 15 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 
शहरातील रानतळे मुख्य रस्ता ते मेंहदीनगर रस्त्यासाठी अल्पसंख्याक विकास निधीतून 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या भागातील हा रस्ता व्हावा अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. त्याची दखल घेत माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण व गटाराचे काम केले जाणार आहे. तसेच शहरातील मुजावर मोहल्ला कब्रस्तानसाठीही 15 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे ॲड.खलिफे यांनी सांगितले. तसेच हा निधी उपलब्ध करून देणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ॲड.खलिफे यांनी आभार व्यक्त केले आहेत.


Comments