आशादीप संस्थेच्या मदतीसाठी राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा रत्नागिरीत 29 रोजी कार्यक्रम
रत्नागिरी प्रतिनिधी:-
मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या आशादीप या वसतिगृहाच्या मदतीसाठी खंजिरी वादनातून सामाजिक प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम 29 एप्रिल रोजी रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कोणतेही शासकीय अनुदान न मिळताही सामाजिक जाणिवेतून मतिमंद मुलांच्या पालकांनी रत्नागिरीत आशादीप या नावाने निवासी कार्यशाळा सुरू ठेवली आहे. कार्यशाळेत या मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य संस्थेचे दिलीप रेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू ठेवले आहे. सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांच्या सहकार यावरच या संस्थेचे कार्य सुरू आहे. आशादीप या मतिमंद मुलांच्या वसतिगृहाच्या मदतीकरिता सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम 29 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आशादीप संस्थेच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे या संस्थेला आर्थिक मदतीचा हात देतानाच त्यांच्या कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आशादीप संस्थेच्या कार्यास हातभार लावावा असे आवाहन दिलीप रेडकर, विलास कोळपे, चंद्रमोहन देसाई, प्रकाश सावंत, विजय पवार, नितीन मुझुमदार यांनी केले आहे.

Comments
Post a Comment