कै. उमेश शेट्ये स्मृती चषक 2022 टी-20 क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरु

रत्नागिरीचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय नगराध्यक्ष कै. उमेशजी शेट्ये यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात आले आहे. दि.13 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील 12 संघ सहभागी होणार आहेत, ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुख्य प्रायोजक म्हणून श्री.केतन उमेश शेट्ये, डॉ.वक्रतुंड उमेश शेट्ये, श्री.राजेंद्र घाग, श्री.अमोल सावंत, तसेच सह प्रायोजक म्हणून रुपेश पेडणेकर, कल्पेश पटेल, राजीव देवळे, आनंद चौगुले, केतन गांगण,गौरांग आगाशे, डॉ. अभय धुळप, श्री.गौरव देसाई ,वैभव पावसकर यांनी मोलाचं सहकार्य केले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु.30000 चषक आणि उपविजेत्या संघाला रोख रु.15000 आणि चषक पारितोषिक मिळणार आहे, तसेच मालिकाविरासाठी लेदर क्रिकेट बॅट देखील खास खास आकर्षण असणार आहे. आजच्या उद्घाटन कार्यक्रमाला श्री.केतन उमेश शेट्ये, डॉ.वक्रतुंड उमेश शेट्ये, श्री.राजेंद्र घाग, श्री.अमोल सावंत, श्री.कल्पेश पटेल, श्री.विजय पवार, श्री.परेश साळवी, श्री.मंदार आचरेकर इत्यादी उपस्थित होते. साहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी अश्या प्रकारचे कार्यक्रम करत राहण्याचा आमचा मानस असल्याच्या भावना त्यांचे पुत्र डॉ.वक्रतुंड शेट्ये यांनी व्यक्त केल्या.

Comments