राजापूर वरचीपेठ येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाच्यावतीने रविवारी 17 एप्रिल रोजी ढोलवादन स्पर्धेचे आयोजन

राजापूर शहरातील वरचीपेठ येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 16 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी 16 एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता सुश्राव्य कीर्तन व हनुमान जन्मोत्सव, सकाळी नऊ वाजता पालखी दर्शन, पालखी धुतपापेश्वर ढोल पथक सोबत निघेल, सायंकाळी सात वाजता पालखी भोवती, त्यानंतर लळीत कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या औचित्याने रविवारी 17 एप्रिल रोजी ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषीक 7,777 रु., द्वितीय पारितोषीक 5,555 रु., त्रुतीय पारितोषीक 3,333 रु. असे बक्षिस देण्यात येणार आहे. इच्छुक संघांनी वैभव खानविलकर - 9028353543, दिनेश पवार - 9226223221, सुमित शेट्ये - 8087667500, विकास बाकाळकर- 9028729702, तुषार नेवरेकर- 7066676250 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Comments