राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न; मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांची प्रमुख उपस्थिती
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथिल राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला. महाविद्यालयाच्या २०१९-२० आणि २०२०-२१ मधील पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे यावर्षी पदवीप्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये मोठा उत्साह होता.
संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, राजेंद्र माने तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे आदी मान्यवरांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व बहुसंख्य स्नातक याप्रसंगी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन, सरस्वती वंदना व विद्यापीठ गीत गायनाने समारंभाला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाची ही २० वी स्नातक तुकडी बाहेर पडत असल्याचे सांगितले.मागील दोन शैक्षणिक वर्षे कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांसाठी फार कसोटीची होती पण या परिणामांना उत्तर देण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्यांनी पुढील कारकीर्द यशस्वी करून यावर मात करावी ही इच्छा त्यांनी प्रकट केली. विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात ज्ञान, कौशल्य, आणि सदवृत्ती याकडे विशेष लक्ष देण्याची त्यांनी सूचना केली आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्य अतिथी डॉ. किशोर सुखटणकर यांनी यानंतर स्नातकांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. ते म्हणाले,यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी तसेच शिक्षणाप्रती तळमळ व स्वयंप्रेरणा आदी विविध गुणधर्मांचे आपल्या कारकीर्दीत महत्त्व आहे. मुंबई विद्यापीठाची दैदिप्यमान कारकीर्द याप्रसंगी त्यांनी मुलांसमोर मांडली अठराशे सत्तावन्न साली स्थापन झालेले हे विद्यापीठ आज आपल्या यशाच्या मानांकनात विविध गोष्टी रुजवत चाललेले आहे आणि अशीच कारकीर्द विद्यार्थीसुद्धा आपल्या भविष्यात निर्माण करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई विद्यापीठाचे कार्यक्षेत्र वाढवणे आणि विभागीय कार्यालये निर्माण करणे यात संस्थेचे चेअरमन मा. रवींद्रजी माने यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Comments
Post a Comment