खेड येथे मनसेच्या वतीने महिला दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची माहीती

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगर पालिकेच्या पाठीमागील स्वर्गीय किशोर कानडे क्रीडांगणावर संध्याकाळी ४ ते १० या वेळेमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सिनेसृष्टीतील सुनील होळकर यांचा 'वहिनी सरकार' हा कार्यक्रम (होम मिनिस्टर) याचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना प्रथम पारितोषिक पैठणी साडी रोख रुपये २२२२/- द्वितीय पारितोषिक साडी, तसेच १५५५/- रुपये रोख तसेच, तृतीय पारितोषिक साडी ७७७/- रोख तसेच, इतर ४० भाग्यवान महिला विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील कलाकारांचा रेकॉर्ड डान्स चा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी महिलांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी शहरातील सर्व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे.

Comments