राजापूर पंचायत समिती येथील किसान भवन सभागृहामध्ये जलजागृती सप्ताह निमित्त जलसुरक्षक यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
जलजागृती सप्ताह दिनांक 22 मार्च 2022 ते 31 मार्च 2022 निमित्त मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी पंचायत समिती राजापूर येथील किसान भवन सभागृहामध्ये जलजागृती सप्ताह निमित्त जलसुरक्षक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमानिमित्त पंचायत समिती राजापूर ग्रामपंचायत विभागाचे डी.पी. नाटेकर विस्तार अधिकारी, तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे बाकाळक, मनीषा पळसमकर व प्रकाश यात्री संस्थेचे हर्डीकर व विलास राडये यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जलजागृती कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षक यांना H2S व्हायरल FTK किट्स वाटप करण्यात आले व पाणी नमुने तपासणीच्या पद्धतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करणे, घरगुती पाण्याचे उपलब्ध असलेले पाणी दीर्घकाळ टिकून राहण्याच्या दृष्टीने गावे वाड्या येथील लोकांचे थेट संपर्क करून त्यांच्याशी जागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले व पाऊस पाणी संकलन, भुजलावर आधारित असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांचे महत्त्व, पाण्याचा ताळेबंद, पाण्याची सुरक्षितता व शाश्वतता, पाणी गुणवत्ता व त्याचे महत्त्व, स्त्रोतांची स्वच्छता व सर्वेक्षण व जी गावे 100% नळ कनेक्शन जोडून झाली, हर घर जल योजनेअंतर्गत आहेत अशा गावांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच FTK किट पाण्याचे ऑनलाईन नोंदी कशा कराव्यात या संबंधित सविस्तर मार्गदर्शन जलसुरक्षक यांना करण्यात आले व जल प्रतिज्ञा घेण्यात आली.
Comments
Post a Comment