यूरोपातल्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे हल्ले, जगावरचं आण्विक संकट पुन्हा गडद?
त्यामुळेच ICAN म्हणजेच इंटरनॅशनल कँपेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन ह्या संस्थेनं असं भाकित केलंय की, जर रशिया आणि अमेरिका यांच्या आण्विक युद्ध झालं तर मरणारांची संख्या ही 10 कोटीकडे असेल.
⏺️यूक्रेनमधल्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचा हल्ला
रशिया आणि यूक्रेन यांच्यातल्या युद्धाचा आजचा नववा दिवस आहे. दोन्ही देशातलं युद्ध अजून तरी निर्णायकी दिसत नाहीय. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जगावरचं आण्विक हल्ल्याचं संकट मात्र गडद होताना दिसतंय. रशियानं आधीच तिसरं महायुद्ध झालं तर ते आण्विक असेल हे पुन्हा पुन्हा सांगितलंय आणि त्याची प्रचिती सध्या येताना दिसतेय. कारण रशियानं यूरोपातल्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर हल्ले सुरु केलेत. हे हल्ले क्षेपणास्त्राचे आहेत. त्याचा परिणाम म्हणून अणूऊर्जा केंद्रातून धूराचे लोट बाहेर पडतायत. हे हल्ले थांबवले नाही तर चेन्नोबेलपेक्षा दहा पट नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जातेय.
यूरोपातलं सर्वात मोठं अणूऊर्जा केंद्र
यूक्रेनचा एक प्रांत आहे जेपोरीजिया (Zaporizhzhia)त्यात शहर आहे एनरहोदर. याच शहरात यूरोपातलं सर्वात मोठं आणि जगातलं 9 व्या क्रमांकाचं अणूऊर्जा केंद्र आहे. रशियन सैन्यानं यूक्रेनवरचे हल्ले वाढवताना ह्या अणूऊर्जा केंद्रालाही लक्ष्य केलंय. असोसिएटेड प्रेसनं यूक्रेनच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त दिलंय की, यूरोपातल्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा केंद्रातून (Zaporizhzhia Nuclear power plant) धुराचे लोट निघतायत. रशियन सैन्यानं ह्या अणूऊर्जा केंद्रावरचे हल्ले बंद करावेत असं आवाहनही यूक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केलंय. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, जर हे अणूऊर्जा केंद्र उडालं तर चेर्नोबिलपेक्षा दहा पट अधिक ब्लास्ट होईल. आता जी आग लागलीय ती रशियन्सनी तातडीनं बंद करावी.
⏺️कुठे आहे हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट?
रशियानं गेल्या दोन दिवसात यूक्रेनच्या विविध शहरावरचे हल्ले तीव्र केलेत. त्यापैकी एनरहोदर नावाचं शहर आहे. हे शहर Zaporizhzhia Oblast च्या उत्तर पश्चिम भागात आहेत. आपल्याकडे नगरपालिका असते तशी ही नगरपालिका लेवलचं शहर आहे. त्या शहरापासून थोड्या अंतरावर Kakhovka धरणाजवळ नीपर नदीच्या किनाऱ्यावर हे अणूऊर्जा केंद्र आहे. या ठिकाणी 6 रिअॅक्टर्स आहेत जे यूरोपातले सर्वात मोठे तर जगातले 9 व्या क्रमांकाचे आहेत. याच अणूऊर्जा केंद्रावर रशिया मोर्टार आणि आरपीजीच्या माध्यमातून हल्ले करतोय. ह्या हल्ल्यातून अणूऊर्जा केंद्राच्या काही भागात आग लागलीय. विशेष म्हणजे ही आग विझवायला येणाऱ्या अग्निशमन दलावरही रशियन लष्कर हल्ले करतंय. त्यामुळे यूक्रेनच नाही तर यूरोप दुहेरी संकटात सापडलाय.
⏺️आधी चेर्नोबिलवर कब्जा
जवळपास 36 वर्षापूर्वी त्यावेळेच्या सोव्हिएत यूनियनमध्ये चेर्नोबिलच्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये एक अपघात झाला होता. ज्यात काही लाख लोक प्रभावित झाले होते. विशेष म्हणजे चेर्नोबिलही आता यूक्रेनमध्येच येतं. पण तो न्यूक्लिअर प्लांट आता बंद आहे. तिथं अजूनही रेडिएशन सक्रिय आहे. एक शहरं पूर्णपणे उद्धवस्त झालंय त्याच्या भुताटकी खाणाखुणा पाहून अजूनही जगाची धडकी भरते. रशियानं काही दिवसापूर्वी हे चेर्नोबिलही ताब्यात घेतलंय. त्यानंतर आता त्यांनी रशियातल्या सर्वोत मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर हल्ले चढवलेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ह्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कि यांच्याशी फोनवरुन चर्चा केलीय. पण पुतीननं आधीच स्पष्ट केलंय, जो कुणी दोघांच्या मधात येईल त्यालाही परिणाम भोगावे लागतील. त्यामुळेच ICAN म्हणजेच इंटरनॅशनल कँपेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन ह्या संस्थेनं असं भाकित केलंय की, जर रशिया आणि अमेरिका यांच्या आण्विक युद्ध झालं तर मरणारांची संख्या ही 10 कोटीकडे असेल.
Comments
Post a Comment