उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांनी उपोषणास बसलेल्या बिनावेतन कर्मचाऱ्यांचा प्रश्न ४८ तासात सोडवला

शांतिनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेज नविन पनवेल येथील कर्मचारी गेले ७ महिने बिना वेतन काम करत होते. संस्था चालकांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून २४ फेब्रुवारी पासून कर्मचारी आमरण उपोषणास बसले होते. यावेळी जिल्हा प्रमुख शिरिष घरत यांच्या आदेशाने हि बातमी जेव्हा नविन पनवेल शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना प्रणित शिक्षकसेनेला समजली तेव्हा शहर प्रमुख यतिन देशमुख आणि शहर सांघटिका सौ. अपूर्वा प्रभू यांनी तात्काळ उपोषण ठिकाणी धाव घेतली. संघटीका सौ. अपूर्वा प्रभू यांनी लगेच उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क करून उपोषण करत्या कर्मचाऱ्यांची सर्व सत्य परिस्थिती त्यांना कळवली आणि त्याच अनुषंगाने ४८ तासाच्या आत मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्या दालनात मीटिंग घेऊन सकारात्मक चर्चा करून संस्थाचालकाला कडक शब्दात आदेश देईन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आणि मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पाणी ग्रहण करून  कर्मच्यारांनी उपोषण सोडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेश पवार, शिक्षक सेनेचे अजित चव्हाण, जगदिश भगत, नाईक, मंगेश पाटील तसेच एम.एस.बी.टी. चे अधिकारी वाघ उपस्थित होते.

Comments