भगिनी मंडळ राजापूरच्यावतीने शनिवार व रविवारी समर्थनगर येथे महिला उद्योजीकांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन

भगिनी मंडळ राजापूरच्या वतीने शनिवार दिनांक 26 मार्च व रविवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत राजापूर शहरातील समर्थनगर शिशुविहार येथे महिला उद्योजिकांसाठी प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या औचित्याने लाकडी वस्तू, घाण्याचे तेल, साड्या, पर्स, विविध प्रकारचे लाडू, फरसाण, चिवडा, चकली, लहान मुलांचे कपडे, चायनीज भेळ, शेवपुरी, पाणीपूरी, कच्छी दाबेली, सरबते, पन्हे, मोदक, सँडविच, हळद लोणचे, फ्रुट ज्यूस, पन्हे, थंडगार सरबते आदींचा आस्वाद राजापूरवासियांना एकाच वेळी एकाच ठिकाणी घेता येणार आहे. 

Comments