रत्नागिरी:आमली पदार्थप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

रत्नागिरी:
बेकायदेशिरपणे सुमारे ५ लाख रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणातील दोन्ही संशयितांना न्यायालयाने बुधवारी ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शियाद ए. के (२५) आणि नजफ मोइदु नौफल (२३, दोन्ही रा. केरळ) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मंगळवारी पहाटे रटाघर ते मांडवी जाणाऱ्या रस्त्यावर हे दोघेही संशयास्पदरीत्या फिरत असताना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना हटकले होते. त्यांतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ते रहात असलेल्या लॉजच्या रुममधून त्यांच्या बॅगमधून हा अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला होता. दरम्यान, हा अमली पदार्थ त्यांनी कोणाकडून खरेदी केला होता. रत्नागिरीत कोणाला विक्री केला किंवा करणार होते का, याबाबत तपास करण्यासाठी न्यायालयाने दोघांचीही पोलिस कोठडीत रवानगी केली.

Comments