राजापूरातील रानतळे येथील पिकनिक स्पॉट परिसर स्वच्छता मोहिमेत नगर परिषद कर्मचा-यांसह माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व स्वच्छता दुत ॲड.जमीर खलिफे सहभागी
राजापूर रानतळे येथील पिकनिक स्पॉट परिसरात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व स्वच्छता दुत ॲड.जमीर खलिफे यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहिम राबवत रानतळे पिकनिक स्पॉट परिसर स्वच्छ केला. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपलेला असतानाही त्यांनी राजापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यावर लक्ष ठेवले आहे.
ॲड.खलिफे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा कालावधीत शहरात स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे राजापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने शहरात फिरून ते स्वत स्वच्छतेची पाहणी करत असत. सध्यस्थितीत त्यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपला असला तरी स्वच्छता दुत म्हणून ते शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान या पिकनिक स्पॉटवर शहरातील नागरीक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी जात असतात. त्यामुळे पिकनिक स्पॉट शुशोभीकरणासाठी 25 लक्ष एवढा निधी मंजूर करून एक दर्जेदार असा पिकनिक स्पॉट बांधण्यात येणार आहे असा मानस ऍड खलिफे यांनी केला आहे. स्वच्छते दरम्यान आरोग्य पर्यवेक्षक सौ. श्रेया शिरवटकर, मुकादम राजा जाधव व कर्मचारी होते.
Comments
Post a Comment