८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राजापूर-लांजा -साखरपा विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ब्युटीशियन प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम शुभारंभ व विविध नैपुण्य प्राप्त महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन
राजापूर -लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघा मध्ये
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आमदार डॉ राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी ब्युटीशियन प्रशिक्षण वर्गाचे राजापूर तालुक्या मध्ये दिनांक ८मार्च रोजी सकाळी ११ ते १ वाजता पंचायत समिती किसान भवन येथे ब्युटीशीयन कोर्स शुभारंभ व सत्कार कार्यक्रम तसेच लांजा नागरी पतसंस्था सभागृह, साटवली रोड नजीक येथे दुपारी ०३ते ०५ वाजता असे तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले आहे.
International Women’s Day : जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
१९०९ पर्यंत महिला दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जायचा. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला होता.
ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरविण्यात आले होते. पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता. त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता. पण त्यानंतर ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला.
महिला दिनानिमित्त सर्व ठिकाणी,विविध स्थरावर कार्यक्रम घेण्यात येतात .महिलांनी मिळवलेल्या यशाचा, अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. अशाच प्रकारे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ब्युटीशीयन कोर्स मधून व्यवसाय निर्मिती हा मोलाचा पर्याय ठरू शकतो. याच उद्देशाने मुलींमध्ये व्यवसायासंबंधीची कौशल्ये विकसित करण्यासाठी कमी वेळात रोजगार मिळवून देणारे प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम करणे हा या शिवसेना महिला आघाडी कार्यक्रमचा मुख्य उद्देश आहे. अत्यल्प फी, आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रशिक्षण संस्थेचे सर्टिफिकेट ही वैशिष्ट्ये असलेला अभ्यासक्रम महिलांना रोजगारासाठी उत्तम मार्ग ठरू शकेल.
स्त्री ही रोजच्या दगदगीच्या आयुष्यात आपल्या प्रत्येक जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडत असते...कधी आई, कधी बहीण, मैत्रीण, पत्नी तर कधी मुलगी होऊन सर्वांची काळजी घेत असते..
पण स्वतःची काळजी घेणं मात्र विसरून जाते...
म्हणूनच ब्यूटीशीयन कोर्स
महिला दिनानिमित्त ब्युटीशियन कोर्स व विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचे सत्कार त्या ठिकाणी केले जाणार आहेत. महिलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी मार्गदर्शनसाठी रत्नागिरी -सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या सम्पर्क प्रमुख नेहा माने, जिल्हा महिला आघाडीच्या वेदा फडके, आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा राजन साळवी, प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम साठी मीनल चित्रे (मुंबई) व टीम व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत तरी सदर महिला कार्यक्रम व प्रशिक्षण वर्गाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका दुर्वा तावडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment