धोकादायक खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष?
सह्याद्री नगर साडवली येथील प्रवाशी बसस्टॉपजवळ गेली अनेक वर्षे सडलेल्या स्थितीत इलेक्ट्रिक खांब असून त्यावरून विद्युतवाहिनी सुरु आहे. तिथे प्रवाशी
शेड असल्याने मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू असून दुकानेही आहेत. त्याचप्रमाणे सदर खांब मोठ्या झाडाला लागून राहिल्याने अनर्थ घडल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याचा संभव आहे. याबाबत काही
स्थानिक दुकानदार यांनी तक्रार केली असून कृपया सदर खांब त्वरित बदलण्यात यावा, यासाठी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment