रत्नागिरीतील श्री देवी भगवती मंदिर शिमगा उत्सवाला प्रारंभ
रत्नागिरी: महाराष्ट्रातील प्रसिध्द असलेल्या रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीच्या शिमगा उत्सवाला प्रारंभ झाला असून दिनांक 17 मार्च 2022 रोजी (होळी आण्यासाठी ) दुपारी दीड वाजता सर्व विश्वस्त मानकरी आणि ग्रामस्थसह श्री देवी भगवती देवीचा अंश झालेल्या मुलासह भगवती मंदिर येथून सहवाद्य निघेल, ती भागेश्वर मंदिर मार्गे ते राममंदिर मार्गे- श्री देव भैरव मंदिर, जोगेश्वरी मार्गे झाडगाव नाका- शिवाजी हायस्कूल मार्गे - जोशी पाणंद येथे श्री प्रसाद वाघधरे यांच्या जागेत जाईल तेथे होळी तोडून गाडीतळ मार्गे- कॉंग्रेसभवन- मुरळीधर मंदिर मार्ग - श्री देव भैरी मंदिर मार्ग- सुभेदार नाका (चरकरवाडी) चरकर होळ देवमार्ग- श्रीराम मंदिर मार्गे, हनुमान वाडी येथे येईल. तेथून भागेश्वर मंदिर मार्ग. श्री हनुमान पार, किल्ला येथे 10 वाजता होळी येईल. तेथून 11 वाजता भगवती मंदिर येथे येईल 12 वाजता होळीचा होम होईल. तरी या होळीच्या कार्यक्रमाला समस्त रत्नागिरीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment