उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्यावतीने उद्या रविवारी स्वा.सावरकर नाट्यगृहात " रत्नागिरीचा शाश्वत विकास " या कार्यक्रमाचे आयोजन
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी उद्या रविवारी " रत्नागिरीचा शाश्वत विकास " या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या औचित्याने मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीकरांसाठी पत्र लिहिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच सन 2004 पासून आपल्या रत्नागिरीचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळत आली याची मला पूर्ण जाणीव आहे. गेली 17 वर्ष कार्यरत असताना समाजातील अनेक घटकांमधील प्रश्नांना न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो आहे. आपली सर्वांची रत्नागिरी शहरासाठी अनेक स्वप्न आहेत तशी माझी पण आहेत आणि म्हणूनच 2019 मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून काम करित असताना रत्नागिरी दर्जेदार शिक्षण देणार एक Educational Hub म्हणून विकसित व्हावं यावर मी अधिक प्रयत्नशील राहिलो. रत्नागिरीत येऊ घातलेले शैक्षणिक प्रकल्प तसेच रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालणारे रत्नागिरीचे सुशोभीकरण, रत्नागिरीतील पर्यटनस्थळांचा विकास अशा अनेक बाबी आपल्या समोर ठेवण्यासाठी मी " रत्नागिरीचा शाश्वत विकास " या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच मनस्वी इच्छा !! आपली उपस्थिती हीच आमची काम करण्यासाठीची ऊर्जा !!
अशा आशयाचे एक पत्र रत्नागिरीकरांसाठी मंत्री उदय सामंत यांनी लिहिले आहे.
सदरचा कार्यक्रम रत्नागिरीतील रविवार दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत स्वा.सावरकर नाट्यगृहात आयोजीत करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment