बिबट्याच्या कातडीसह एकाला घेतले ताब्यात
रत्नागिरी:
कणकवली येथील 56 वर्षीय इसमाला बिबट्याच्या कातडीसह लांजा येथे ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि लांजा पोलीस स्थानक यांनी कुवे गणपती मंदिर येथे ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी स्थानिक महामार्गावर सायंकाळी ४ ते ५ यावेळेत गस्त घालत होते.
सायंकाळी ४. ३० वा. दरम्याने कुवे गणपती मंदिर येथील हॉटेल आर्याप्रसाद समोर असताना सिंधुदुर्गकडून रत्नागिरीच्या दिशेने घेवून जाणारे चालक विद्याधर प्रभाकर भिडे (वय - ५६ रा. कणकवली) हे आपल्या ताब्यातील ओमनी क्र. ( एम. एच. 07 ए. जी. 0513) हे कुवे गणपती मंदिर येथे आले असता पोलिसांनी त्यांची गाडी थांबवून चौकशी करत असताना संशय आला. गाडीची तपासणी केली असता गाडीच्या सिटच्या विभाग व लांजा पोलीस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यासह लांजा पोलीस पथक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री विद्याधर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहेत,
Comments
Post a Comment