रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस माहेर संस्थेत साजरा
रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रत्नागिरी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांच्या माध्यमातून रत्नागिरीतील माहेर संस्थेत वाढदिवस साजरा करण्यात आला.
माहेर संस्थेतील निराधार मुले आणि वयोवृद्ध महिलांना खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक कार्य या हेतुने त्यांच्यासमवेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी तेथे कार्यरत असलेल्या सेवकांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती परशुराम कदम व हातखंबा जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.
Comments
Post a Comment