राजापूर पंचायत समितीने महावितरणची पथदिव्यांची बिलाची थकबाकी रक्कम न भरल्याने राजापूर तालुका अंधारात जाण्याची शक्यता
राजापूर पंचायत समितीने महावितरणची पथदिव्यांची बिलाची थकबाकी रक्कम न भरल्याने राजापूर तालुका अंधारात जाण्याची शक्यता आहे.
राजापूर पंचायत समितीने महावितरणला द्यावयाची पथदिव्यांच्या बिलाची तब्बल सुमारे दोन लाखांची थकबाकी प्रलंबित राहिल्याची बाब समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची राजापूर पंचायत समितीकडे पथदिपच्या राजापूर तालुक्यातील एकूण 54 कनेक्शनची रु.2,01,420 एवढी थकबाकी दिनांक 31 मार्च 2022 अखेर प्रलंबित आहे.यासाठी राजापूर पंचायत समितीकडे रु.17,47,551 एवढे अनुदान प्राप्त होऊनही महावितरणची थकबाकी रक्कम न भरल्याने राजापूर तालुका अंधारात राहण्याची दाट शक्यता आहे. अनुदान जमा होऊनही महावितरणची थकबाकी जमा करण्यात एवढा उशिर का होतोय असा सवाल महावितरणकडून उपस्थीत होतोय.
Comments
Post a Comment