आंबोळगड, कशेळीसाठी "येवढ्या" कोटींचा निधी
रत्नागिरी:
किनाऱ्यावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाकडून राजापूर तालुक्यातील आंबोळगड आणि कशेळीसाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील साठ लाख रुपये पत्तन विभागाकडे वर्ग करण्यात आले; तर गणपतीपुळेतील जेट बोट क्लबसाठी मंजूर असलेल्या तीन कोटीपैकी एक कोटी ८० लाख वर्ग केले आहेत. पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध झाल्याने एक दिवसाचे पर्यटनस्थळ म्हणून बसलेला शिक्का पुसण्यास मदत होणार आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४६ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील १४ कोटी ३४ लाख ९२ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे आणि कशेळी समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये आंबोळगड (ता. राजापूर) समुद्र किनारी पर्यटकांसाठी
मुलभूत सुविधा विकसित करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment