रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी व अधिनस्त विभागीय कार्यालयांमार्फत दि.१६ मार्च ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी व अधिनस्त विभागीय कार्यालयांमार्फत दि.१६ मार्च ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवार दिनांक २०/०३/२०२२ रोजी सिंचन भवन कुवारबाव ते मारुती मंदिर, रत्नागिरी दरम्यान जलजागृती करण्यासाठी जलदौड ( Water Run) आयोजित करण्यात आली होती. मा. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी व कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, रत्नागिरी यांच्या उपस्थितीत सिंचन भवन कुवारबाव येथून सकाळी ७.३० वाजता जलदौडचा शुभारंभ झाला. सदर जलदौडीमध्ये मुख्यालयातील रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, दक्षिण रत्नागिरी खारभूमी विकास विभाग व मृदा व जलसंधारण विभागातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जलदौड टीआरपी, साळवी स्टॉप शिवाजीनगर मार्गे मारुती मंदिर येथे सकाळी ८.३० वाजता पोहोचली. त्या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे स्वागत मा. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी यांनी केले. मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या उपस्थितीत जलपूजन करून "पाणी हेच जीवन" या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. तद्नंतर जल प्रतिज्ञेचे वाचन करून जलदौडीची सांगता झाली.
Comments
Post a Comment