मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्र परिसरात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात दिनांक 10 मार्च ते 13 मार्च 2022 या कालावधीत ईनडोअर व आऊटडोअर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
ईनडोअर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास रत्नागिरी कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कॅरम चॅम्पियनशीपसाठी भारताचे प्रतिनिधित्व केलेले रियाझ अकबर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन चे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचे महत्त्व उद्धृत केले. तसेच खेळात हार जी महत्त्वाची नसून सहभाग महत्त्वाचा असं प्रतिपादन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे रियाझ सरांनी प्रत्यक्ष कॅरम स्पर्धेचा सामना सुरू करत विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आऊटडोअर क्रीडा प्रकारांच्या उद्घाटन कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, उद्योजक किरण सामंत, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. पी. कुलकर्णी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते. किरण सामंत यांनी प्रत्यक्ष सामन्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.प्राध्यापक वर्गाचा सहभाग ही उल्लेखनीय होता.या संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे आयोजन उप परिसराच्या सांस्कृतिक विभागाने केले. या करिता रत्नागिरी उप परिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर आणि सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरगावे यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment